VERIFICATION-No.1 Best Study Notes of Auditing

In this VERIFICATION-No.1 Best Study Notes of Auditing article, we are going to discuss the concept of verification. Its meaning, definition, objectives, and duties regarding verification.

VERIFICATION-No.1 Best Study Notes of Auditing

 

VERIFICATION-No.1 Best Study Notes of Auditing

Concept of Verification in Enlgish

Introduction of Verification

Verification involves ascertaining the genuineness of an asset or liability by using all possible means available without an authenticator. Verification can be done only after closing all the books of account and clearing the surplus. Certification does not require verification. Verification has to examine the entire writing/account. The verification has to assess assets and liabilities. Ensures verification of assets and liabilities.

Definition of Verification

1. “Verification means to prove or convince of truth, verification of wealth means to prove the truth about wealth.
2. “Verification of life/property means to inquire into the property’s value, ownership and right of ownership, existence, possession and its encumbrance (i.e. if any debt has been raised against its mortgage).” Spicer and Pegler
3. “Verification of life/property means proving its authenticity. – Tandon
4. “Validation is the act of valuing or ascertaining the assets of a company or business.” – Dr. Ajinath Head –

Verification is not only the job of an accountant to ascertain the value of assets and liabilities in the position distribution, to see whether the assets have been received or not, but also to certify the following:
(1) Assets recorded in the books of account exist in the business. is
(2) The property belongs to the party/liable.
(3) It has been accurately assessed on the date of the statement of position
(4) The property is used in day-to-day operations.

Objectives of Verification

(a) Objectives of verification of assets:

These objectives are as follows:
(1) Ensuring that all assets in the balance sheet exist.
(2) Satisfying that assets are shown at fair value in the balance sheet.
(3) To ensure that there are no encumbrances on the property.
(4) Ensuring that all assets shown in the balance sheet are owned by the business.
(5) To ensure that the property is used only for business purposes.
(6) Detection of misrepresentation of the property.

(b) Objectives of Verification of Payments:

These objectives are as follows:
(1) To ensure that all the dues of the trader/party are mentioned in the balance sheet.
(2) To ensure that all liabilities shown in the balance sheet are genuine.
(3) To ensure that all liabilities shown in the balance sheet are shown at fair value.
(4) Detection of falsification of liability.
The purpose of verification is to check and satisfy yourself about all the above.

Auditor’s Duties regarding verification

(a) Duties of the auditor regarding verification of assets :
(1) All accounts should be compared with balance sheets.
(2) Ensure that every asset/asset written in the accounts exists.
(3) Prove that the business owner is in possession of the property.
(4) Find out if the business property is mortgaged.
(5) Ensure that the property is used for business purposes.

(6) To ascertain what or what kind of alteration has been made in the original property.
(7) Depreciation on property and its rate should be ensured.
(8) Ensure that there are no encumbrances on business property.
(9) Ensure that the total assets of the business are properly mentioned in the balance sheet.
(10) Detection of falsification of property.

(b) Duties of the auditor regarding verification of liability :
(1) To ensure that all the payable entries of the business are properly made in the balance sheet.
(2) Ensure that the liabilities shown in the balance sheet relate to the business.
(3) To ensure that amounts payable are not under or over-stated.
(4) It should be checked that the liability is as of the date on which the balance sheet is.

(5) To find out if the actual liability includes doubtful liability and show such liability separately.
(6) To ensure that a proper record of outstanding liabilities is taken.
(7) Ensuring that amounts due are business and not personal.
(8) To ensure that contingent liabilities, if any, are correct and authorized in the balance sheet.

Concept of Verification in Marathi

सत्यापानाची प्रस्तावना

सत्यापनात प्रमाणकाशिवाय उपलब्ध असलेल्या सर्व संभाव्य साधनांचा उपयोग करून मालमत्ता किंवा देयतेच्या खरेपणाविषयी खात्री करून घेतली जाते. सत्यापन सर्व लेखापुस्तके बंद करून आधिक्ये काढल्यावरच करता येते. प्रमाणन करण्यासाठी सत्यापनाची आवश्यकता नसते. सत्यापनात संपूर्ण लेखनाचे/खात्याचे परीक्षण करावेच लागते. सत्यापनात मालमत्ता आणि देणी यांचे मूल्यांकन करावेच लागते. मालमत्ता आणि देयतेच्या सत्यापनाबद्दल खात्री होते.

सत्यापानाची व्याख्या

१. “सत्यापन म्हणजे सत्य सिद्ध करणे अथवा त्याची खात्री पटविणे, संपत्तीचे सत्यापन म्हणजे संपत्तीबाबत सत्य सिद्ध करणे होय.

  1. “जिंदगीचे/मालमत्तेचे सत्यापन म्हणजे मालमत्तेचे मूल्य, मालकी व मालकी हक्क, अस्तित्व, ताबा आणि तिची भारयुक्तता (म्हणजेच तिच्या तारणावर काही कर्ज काढलेले असल्यास) याची चौकशी करणे होय.” स्पायसर आणि पेगलर
  2. “जिंदगीचे/मालमत्तेचे सत्यापन म्हणजे तिचा खरेपणा सिद्ध करणे होय. – टंडन
  3. “कंपनी किंवा व्यवसायाकडे असलेल्या संपत्तीचे मूल्यमापन करणे किंवा त्याची खात्री पटवून घेणे म्हणजे सत्यापन होय.” – डॉ. अजिनाथ डोके –

सत्यापन म्हणजे स्थिती वितरणातील मालमत्ता व देयतेच्या मूल्याबद्दल खात्री करून घेणे, मालमत्ता मिळालेली आहे किंवा नाही हे पाहणे एवढेच हिशेबतपासनिसाचे काम नाही तर त्याला पुढील गोष्टी प्रमाणित कराव्या लागतात :
(1) लेखापुस्तकात नोंदविलेली मालमत्ता व्यवसायात अस्तित्वात आहे. आहे.
(2) ही संपत्ती पक्षकाराच्या/अशिलाच्या मालकीची आहे.
(3) स्थिती विवरणाच्या दिवशी तिचे अचूक मूल्यांकन झालेले
(4) मालमत्तेचा दैनंदिन व्यवहारात उपयोग केला जातो.

सत्यापनाचे उद्देश (Objectives of Verification)

(अ) मालमत्तेच्या सत्यापनाचे उद्देश :

हे उद्देश पुढीलप्रमाणे :
(1) ताळेबंदातील सर्व मालमत्ता अस्तित्वात आहे याची खात्रीकरणे.
(2) ताळेबंदात मालमत्ता योग्य मूल्याने दाखविल्याबद्दल समाधान करून घेणे.
(3) मालमत्तेवर कोणताही प्रभार नसल्याची खात्री करून घेणे.
(4) ताळेबंदात दाखविलेली सर्व मालमत्ता व्यवसायाच्या मालकीची असल्याची खात्री करून घेणे.
(5) मालमत्तेचा उपयोग व्यवसायाकरिताच केला जातो याची खात्री करून घेणे.
(6) मालमत्तेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे.

(ब) देयतांच्या सत्यापनाचे उद्देश :

हे उद्देश पुढीलप्रमाणे :
(1) व्यावसायिकाच्या/पक्षकाराच्या सर्व देण्यांचा उल्लेख ताळेबंदात केला आहे याची खात्री करून घेणे.
(2) ताळेबंदात दाखविलेली सर्व देणी वास्तविक असल्याबद्दल खात्री करून घेणे.
(3) ताळेबंदात दाखविलेली सर्व देणी योग्य मूल्याने दाखविली असल्याबाबत खात्री करून घेणे.
(4) देयतेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढणे.
वरील सर्व गोष्टींची तपासणी करून त्याबद्दल स्वतःचे समाधान व खात्री करून घेणे हा सत्यापनाचा उद्देश असतो.

सत्यापनासंबंधी अंकेक्षकाची कर्तव्ये

(अ) मालमत्तेच्या सत्यापनाविषयी अंकेक्षकाची कर्तव्ये :
(1) सर्व खात्यांची ताळेबंदांशी तुलना करावी.
(2) लेख्यांमध्ये लिहिलेली प्रत्येक संपत्ती/मालमत्ता अस्तित्वात असल्याची खात्री करावी.
(3) मालमत्तेवर व्यवसायाच्या मालकाचाच ताबा आहे हे सिद्ध करावे.
(4) व्यवसायातील मालमत्ता गहाण टाकली असल्यास शोधून काढावे.
(5) मालमत्तेचा उपयोग व्यवसायाकरिता केला जातो याविषयी खात्री करून घ्यावी.
(6) मूळ मालमत्तेमध्ये कोणत्या प्रकारचा बदल केला गेला किंवा काय याबद्दल खात्री करून घ्यावी.
(7) मालमत्तेवर घसारा व त्याचा दर योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.
(8) व्यवसायातील मालमत्तेवर कोणताही प्रभार नसल्याची खात्री करून घ्यावी.
(9) व्यवसायातील एकूण सर्व मालमत्तेचा उल्लेख ताळेबंदात योग्य प्रकारे केला असल्याची खात्री करून घ्यावी.
(10) मालमत्तेविषयी केलेला खोटेपणा शोधून काढावा.

(ब) देयतेच्या सत्यापनासंबंधी अंकेक्षकाची कर्तव्ये :
(1) व्यवसायातील सर्व देयतेच्या नोंदी ताळेबंदात योग्य प्रकारे केल्या गेल्या आहेत याविषयी खात्री करून घेणे.
(2) ताळेबंदात दर्शविलेली देयता व्यवसायाशी संबंधित असल्याची खात्री करून घ्यावी.
(3) देयतेच्या रकमा कमी अथवा जास्त दाखविलेल्या नाहीत याविषयी खात्री करून घेणे.
(4) ज्या तारखेचा ताळेबंद आहे त्या तारखेला ती देयता आहे याची तपासणी करावी.
(5) प्रत्यक्ष देयतेमध्ये संदिग्ध देयतेचा समावेश केला असेल तर त्याचा शोध घेणे आणि अशी देयता स्वतंत्रपणे दर्शविणे.
(6) थकीत दायित्वाची (Outstanding Liabilities) योग्य ती नोंद घेतली गेली आहे याविषयी खात्री करून घेणे.
(7) दायित्वासंबंधीच्या रकमा व्यवसायाच्याच आहेत, व्यक्तिगत नाहीत याविषयी खात्री करून घेणे.
(8) ताळेबंदात संभाव्य (Contingent) देयता दर्शविली असल्यास ती योग्य व अधिकृत आहे याविषयी खात्री करून घेणे.

Read More

Vouching for the Credit Side of Cash Book – No.1 Best Study Notes

Vouching of the receipt side of the cash book – No.1 Best Study Notes for Exam

What is TEST CHECKING? No.1 Best Study Notes for Exam

What is Internal Auditing? – Best No.1 Study Notes for Exam

INTERNAL CHECK – Best Study Notes for 2022 Exam

INTERNAL CONTROL – Best Study Notes for 2022 Exam

No.1 perfect notes on Auditing History, Meaning, Nature, Scope, objectives

Easy 22 Types of Audits

11 Advantages of Auditing – Best Study Notes for 2022 Exams

Errors and Frauds in Auditing – Best study notes for 2022 Exams

Audit Notebook and Audit Working Papers – Best study notes for the 2022 Exam

Audit Program – Best study notes for 2022 Exam

Super MCQ QUIZ on Auditing SET 2

Free Auditing MCQ Quiz Set 3 for Exam 2022

Current Affairs and General Knowledge

Leave a Reply

Your email address will not be published.