Audit Program – Best study notes for 2022 Exam

Audit Program

Audit Program

In this article we are going to discuss a detail information of Audit Program in English and Marathi also.

Meaning of Audit Program

Every auditor has to undergo an accounting program before starting audit work. Taking into consideration the business, scope of work and method of accrual and expenditure of the organization whose accounts are to be audited, the audit program of that organization has to be prepared to decide which things are to be audited and who is to be audited and in what manner.

The actual audit work is not done by the auditor himself. Senior clerks, junior clerks and apprentice clerks work under him. This program is prepared to distribute the work among these employees and to guide them on what to check while working. This work is allocated keeping in mind the qualification, interest and experience of the audit staff.

Definition of Audit Program

An audit program is a well-planned outline of the audit work that guides what work is to be done by whom, when, and how. An audit program is a pre-planning of audit work to be performed by employees.

Advantages of Audit Program

(1) An audit program defines the work of each employee. So everyone gets an idea of their work. Work can be allocated according to efficiency, as per the qualifications of each.

(2) The auditor gets a quick idea of the progress of the day-to-day work of the audit.

(3) This program is useful in planning the audit work for the next year. Instant planning is possible.

(4) Continuity can be maintained in the work and method of auditing.

(5) The principle of division of labor can be used properly and the responsibility of each employee can be determined.

(6) Audit program provides proper guidance to new employees, so they can do their job better.

(7) Since the responsibility of the staff is fixed, every staff member works carefully and responsibly, thus the audit work becomes more efficient. There are no errors in the work.

(8) This program can be presented in court as evidence of its efficiency. Hence the allegation of negligence cannot be proved.

Disadvantages of Audit program

(1) Lack of new knowledge

A new employee does not have the scope to develop his own independent, appropriate auditing style or method. Due to this, he feels monotonous in his work and his enthusiasm decreases. A pre-planned program kills initiative.

(2) Often the same program is used for years. So the experience of the employees cannot be taken advantage of.

(3) Confusion may increase among the workforce.

अंकेक्षण कार्यक्रम (AUDIT PROGRAMME)

अर्थ

प्रत्येक अंकेक्षकाला अंकेक्षणाचे काम सुरू करण्यापूर्वी हिशेबतपासणीचा कार्यक्रम करावा लागतो. ज्या संस्थेचे हिशेब तपासावयाचे असतील त्या संस्थेचा व्यवसाय, कार्याचा व्याप व जमा-खर्चाची पद्धत विचारात घेऊन त्यानुसार प्रत्यक्ष अंकेक्षणात कोणत्या गोष्टी तपासावयाच्या व कुणी तपासावयाच्या आणि कशा पद्धतीने तपासावयाच्या हे ठरविण्यासाठी त्या संस्थेचा अंकेक्षण कार्यक्रम तयार करावा लागतो.

प्रत्यक्ष अंकेक्षणाचे काम अंकेक्षक स्वतःच करीत नसतो. त्याच्या हाताखाली वरिष्ठ कारकून, कनिष्ठ कारकून आणि शिकाऊ कारकून काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे वाटप करण्यासाठी व ते काम करताना काय-काय तपासावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात येतो. अंकेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पात्रता, आवड व अनुभव लक्षात घेऊन हे कामाचे वाटप केले जाते.

व्याख्या

अंकेक्षण कार्यक्रम ही अंकेक्षणाच्या कामाची सुनियोजित रूपरेखा आहे की, ज्यात कोणते काम कुणी, कधी, केव्हा व कशा प्रकारे करावयाचे याचे मार्गदर्शन केलेले असते. अंकेक्षण कार्यक्रम हे कर्मचाऱ्यांनी करावयाच्या अंकेक्षणाच्या कामाचे पूर्वनियोजन होय.

अंकेक्षण कार्यक्रमाचे फायदे

(1) अंकेक्षण कार्यक्रमाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम ठरवून दिले जाते. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या कामाची कल्पना येते. प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे, कार्यक्षमतेनुसार कामाचे वाटप करता येते.

(2) अंकेक्षणाच्या दैनंदिन कामकाजाच्या प्रगतीची कल्पना अंकेक्षकाला चटकन येते.

(3) हा कार्यक्रम पुढील वर्षी अंकेक्षणाच्या कामकाजाचे नियोजन करताना उपयुक्त ठरतो. त्वरित नियोजन करणे शक्य होते.

(4) अंकेक्षणाच्या कामकाजात व पद्धतीत सातत्य ठेवता येते.

(5) श्रमविभागणीच्या तत्त्वाचा योग्य प्रकारे वापर करता येतो व प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करता येते.

(6) नवीन कर्मचाऱ्यांना अंकेक्षण कार्यक्रमामुळे योग्य ते मार्गदर्शन मिळते, त्यामुळे ते आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.

(7) कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होत असल्यामुळे प्रत्येक कर्मचारी काळजीपूर्वक व जबाबदारपणे कार्य करतो, त्यामुळे ऑडिटचे काम अधिक कार्यक्षमतेने होते. कामात त्रुटी राहत नाहीत.

(8) न्यायालयात आपल्या कार्यक्षमतेचा पुरावा म्हणून हा कार्यक्रम सादर करता येतो. त्यामुळे निष्काळजीपणाचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही.

अंकेक्षण कार्यक्रमाचे तोटे

(1) नवीन ज्ञानाचा अभाव

नवीन कर्मचाऱ्याला आपली स्वतंत्र, योग्य अशी अंकेक्षणाची शैली अथवा पद्धत विकसित करण्यासाठी वाव नसतो. त्यामुळे त्याला कामकाजात तोच-तोचपणा जाणवतो व त्याचा उत्साह कमी होतो. पुढाकार घेण्याच्या प्रवृत्तीला पूर्वनियोजित कार्यक्रम मारक ठरतो.

(2) बऱ्याचदा तोच-तो कार्यक्रम तसाच वर्षानुवर्षे वापरला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अनुभवांचा फायदा घेता येत नाही.

(3) कर्मचारी वर्गामध्ये गोंधळ वाढू शकतो.

Read More

No.1 perfect notes on Auditing History, Meaning, Nature, Scope, objectives

11 Advantages of Auditing – Best Study Notes for 2022 Exams

Errors and Frauds in Auditing – Best study notes for 2022 Exams

Easy 22 Types of Audits

Free Good MCQ QUIZ on Auditing SET 1

Super MCQ QUIZ on Auditing SET 2

Free Auditing MCQ Quiz Set 3 for Exam 2022

Leave a Reply

Your email address will not be published.